सीसीटीव्ही कॅमेरात सायकल चोर सापडला

| उरण | वार्ताहर |
उरण न्यायालयाच्या जवळच राहत असलेल्या निष्कर्ष प्रमोद ठाकूर या तरुणांनी इमारतीच्या आवारात पार्किंग करुन ठेवलेली सायकल अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा उठवत चोदण्याची घटना घडली आहे. सदर घटना ही शनिवारी (दि17) घडली असून अज्ञात चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत.अशी माहिती तक्रारदार प्रमोद ठाकूर यांनी दिली आहे.

निष्कर्ष ठाकूर यांनी आपली सायकल इमारतीच्या आवारात पार्किंग करुन ठेवलेली होती.रविवारी ( दि18) सकाळी उठल्यावर पार्किंग करुन ठेवलेली सायकल गायबच झाली असल्याचे दिसून आले.त्यानंतर शोधाशोध केली.आणि इमारतीच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता.तीन अज्ञात व्यक्ती इमारतीच्या आवारात वावरत असताना व सायकल चोरताना दिसून आले.

Exit mobile version