सावित्रीच्या लेकींना होणार सायकलींचे वाटप

नारंगी ग्रा.पं.च्या नवीन वास्तूचे उद्घाटन
आ. जयंत पाटील, माजी आ. पंडित पाटील यांची प्रमुख उपस्थिती
आस विद्यालय अ‍ॅपचा शुभारंभ

| अलिबाग | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील नारंगी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गरीब व गरजू शालेय विद्यार्थिनींना सोमवार, दि. 31 जानेवारी रोजी सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे. याचवेळी ग्रामपंचायतीच्या नवीन वास्तूचे उद्घाटन तसेच आस विद्यालय अ‍ॅपचा शुभारंभ शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील व माजी आ. पंडित पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रम दुपारी साडेचार वाजता पार पडणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजिप प्रतोद, शेकाप जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील, जि.प. सदस्य भावना पाटील, पं.स. सभापती प्रमोद ठाकूर, शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, पं.स. माजी उपसभापती अनिल पाटील, मारुती पाटील, अशोक हिरामत, चिलेत्राा हिरामत, विकास काकवानी, लिला काकवानी, नैना पिमेंटा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नारंगी सरपंच स्मिता पाटील, उपसरपंच अमोल पाटील, सदस्य विनोद पाटील, शिल्पा म्हात्रे, राजेंद्र म्हात्रे, सविता धुमाळ, अमृता म्हात्रे, वर्षा पाटील, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी मेहनत घेत आहेत. या कार्यक्रमास ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version