| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून ८ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून चित्रलेखा नृपाल पाटील यांच्या सौजन्याने मापगाव हद्दीतील ” सावित्रीच्या लेकींना ” विजय भगत यांच्या निवासस्थानी मुनवली – मापगाव येथे सायंकाळी ५.३० वाजता मोफत सायकलींचे वाटप होणार आहे. या कार्यक्रमाकरिता शेकापचे जेष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा नृपाल पाटील, विजय भगत, संतोष गावंड, अशोक नाईक, अशोक घरत, जे. पी. घरत, समिहा पाटील, रुपाली म्हात्रे, नेहा सचिन म्हात्रे, प्रिती पाटील, जगन्नाथ पाटील, मज्जीद कुर, लाईक कप्तान आणि इतर मान्यवर सायकल लाभार्थी मुली व त्यांचे पालक आणि विभागातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित राहणार आहेत.