बांगलादेश संघाला मोठा धक्का

मॅचदरम्यान स्टार खेळाडू जखमी

। न्यूयॉर्क । वृत्तसंस्था ।

भारताविरुद्धच्या सराव सामन्यात बांगलादेश संघाला 60 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात बांगलादेशचा एक स्टार खेळाडू जखमी झाला असून टी-20 विश्‍वचषकाच्या पहिल्या सामन्यात खेळणे कठीण दिसत आहे. कारण त्याच्या डाव्या हाताला सहा टाके पडले.

भारताविरुद्धच्या सराव सामन्यात बांगलादेशचा वेगवान गोलंदाज शरीफुल इस्लामला दुखापत झाली आहे. भारताविरुद्ध त्याला चार षटकांचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्याने भारतीय डावातील शेवटचे षटक टाकले आणि या षटकाच्या पाचव्या चेंडूवर शॉरीफुल इस्लामने यॉर्कर चेंडू टाकला, आणि हार्दिक पांड्याने जोरात मारला. आणि चेंडू त्याच्या दिशेने गेला जो हाताला लागला. त्यानंतर त्याचा हात सुजला. त्यामुळे शॉरीफुल इस्लाम मैदानाबाहेर गेला. शॉरीफुल इस्लामची ही दुखापत बरी होण्यासाठी किमान एक आठवडा लागेल. त्यामुळे विश्‍वचषकातील बांगलादेशच्या पहिल्या सामन्यात खेळणे त्याच्यासाठी कठीण आहे. बांगलादेशला 8 जूनला श्रीलंकेविरुद्ध सामना खेळायचा आहे. शरीफुलची दुखापत बांगलादेशसाठी मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही.

Exit mobile version