| काठमांडू | वृत्तसंस्था |
नेपाळ क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. नेपाळ क्रिकेट संघाचा अव्वल फिरकीपटू संदीप लामिछाची नुकतेच बलात्काराच्या आरोपातून मुक्तता झाली होती. मात्र, त्याचा अमेरिकेसाठीचा व्हिसा नाकारल्याने त्याला आता टी-20 वर्ल्डकप 2024 मध्ये भाग घेता येणार नाही आहे. याची माहिती खुद्द संदीप लामिछानेने सोशल मीडियावरून दिली.
लामिछानेचा 2019 मध्ये देखील व्हिसा नाकारण्यात आला होता. नेपाळ क्रिकेट असोसिएशनने संदीप लामिछानेचा टी-20 वर्ल्डकप संघात समावेश केला नव्हता. जे खेळाडू जेलमध्ये गेलेले असतात त्यांना आयसीसीकडून क्लिअरन्स मिळाल्याशिवाय त्यांचा संघात समावेश करता येत नाही. कोर्टाने त्याची बलात्काराच्या आरोपातून मुक्तता केली होती. तरीदेखील त्याला आयसीसीच्या परवानगीची गरज होती. मात्र, न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केल्यानंतर नेपाळ क्रिकेट बोर्डाने त्याचा टी-20 वर्ल्डकप संघात समावेश केला. बलात्काराचे आरोप झाल्यानंतर संदीप लामिछानेला आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमधून निलंबित केले होते. त्याच्या केसचा निकाल लागल्यानंतर त्याला पुन्हा संघात स्थान मिळाले होते.