। जयपूर । वृत्तसंस्था |
आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सने सलग चौथ्या विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. शनिवारी रात्री जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या महत्त्वाच्या सामन्यात राजस्थानने आरसीबीविरुद्ध पाच चेंडू शिल्लक असताना सहा गडी राखून विजय मिळवला. मात्र, या विजयासह राजस्थानलाही मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना खेळू शकणार नाही. राजस्थान रॉयल्सचे सहाय्यक प्रशिक्षक शेन बॉन्ड यांनीच सामन्यानंतर ही माहिती दिली. तो म्हणाला की, वेगवान गोलंदाज संदीप शर्मा दुखापतीतून सावरत आहे, पण पुढच्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता नाही.
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत राजस्थान रॉयल्सचे वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉन्ड यांनीही संदीप शर्माच्या दुखापतीबाबत माहिती दिली. संदीप शर्माला काही प्रॉब्लेम असून तो पुढच्या सामन्यापर्यंतही फिट नसल्याचा खुलासा त्याने केला. आम्ही अजूनही काम करत आहोत, असे बाँड म्हणाले.
राजस्थानला मोठा धक्का
