सीएनजी-पीएनजीच्या दरातही मोठी वाढ

। मुंबई । वृत्तसंस्था ।
सातत्याने होत असणारी महागाई सामान्यांच्या डोक्याला ताप होत चालली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात सतत होत असणारी वाढ गेल्या आठवडाभरापासूनथांबली आहे. परंतु सीएनजी-पीएनजीच्या दरात बुधवारी पुन्हा एकदा मोठी वाढ करण्यात आली. मुंबईसह पुणे आणि नागपूरमध्ये सीएनजीचे दर प्रतिकिलो 5 रुपयांनी वाढ झाली आहे. इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने नागरिकांनी बुडत्याला काठीचा आधार म्हणून सीएनजी-पीएनजीवरील वाहनांचा पर्याय निवडला आहे. परंतु आता सीएनजी आणि पीएनजीच्या दरातही मोठी वाढ होत असल्याने सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. जाहीर झालेल्या नव्या दरानुसार, सीएनजीचा दर किलोमागे 72 रुपये झाला आहे. पीएनजीचा दर आता किलोमागे 45.50 रुपये इतका झाला असून सीएनजी प्रतिकिलो 5 रुपयांनी, तर घरगुती पाईप अर्थात पीएनजी साडेचार रुपयांनी महागला आहे.

Exit mobile version