बारामतीत अजित पवारांची मोठी पिछाडी

सुप्रिया सुळे यांची २५ हजार मतांची आघाडी

| मुंबई | प्रतिनिधी |

बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अजित पवार यांचा मतदार संघ असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी लीड मिळाली आहे. तर दुसरीकडे अजित पवार गट कुठेही आघाडीवर नसल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी पक्षात मोठी फूट पडल्यानंतर बारामतीतील लोकसभा निवडणूक ही पहिलीच होती. इतिहासात पहिल्यांदाच पवार विरूद्ध पवार असा सामना बारामती लोकसभा मतदारसंघात पाहिला मिळाला. त्यामुळे राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आज बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू असताना सुप्रिया सुळे या आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर, सुनेत्रा पवार या पिछाडीवर आहेत. सध्या आलेल्या अपडेटनुसार, सुप्रिया सुळे या 25 हजार मतांनी आघाडीवर आहेत.

Exit mobile version