मोठी बातमी! दहावीच्या निकालाची तारीख जाहीर

| पुणे | प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी जाहीर करणार याबाबत मोठी घोषणा केली आहे. पालक व विद्यार्थी दहावीच्या निकालाची वाट पाहत होते. आता अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता दहावीचा निकाल सोमवारी (दि.27) दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

दहावीची परीक्षा पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोकण आणि लातूर विभागांमार्फत परीक्षांचं आयोजन केले जाते. या विभागीय मंडळांकडून उत्तर पत्रिका तपासणे आणि निकाल तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ निकाल कधी जाहीर करणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते.

निकाल ‘या’ वेबसाईटरवर पाहता येणार
दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल www.mahresult.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध होईल.

Exit mobile version