| मुंबई | प्रतिनिधी |
तेलुगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान झालेल्या दुर्घटनेप्रकरणी अटक करण्यात आली आहे. हैदराबादमधील चिकलाडपल्ली पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, या चेंगराचेंगरीमध्ये एका 39 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. तिचा मुलगा देखील गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी संध्या थिएटरचे व्यवस्थापन अल्लू अर्जुन आणि त्याच्या सुरक्षा पथकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
हैद्राबादच्या संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 चित्रपटाचा प्रीमिअर शो आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अल्लू अर्जुनने पोलिस प्रशासनाना माहिती न देता उपस्थित लावली. अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी झाली. अचानक झालेल्या गर्दीचे व्यवस्थापन त्या चित्रपट व्यवस्थापकांना करता आलं नाही. परिणामी त्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. 4 डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर त्या महिलेच्या कुटुंबीयांनी अल्लू अर्जुन आणि संध्या थिएरट मालकाच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता.
अल्लू अर्जुनला शुक्रवारी चिकलाडपल्ली पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पुष्पा फेम अल्लू अर्जुनला पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन अटक केली. त्यानंतर त्याला हैद्राबादच्या गांधी रुग्णालयात मेडिकल टेस्टसाठी हजर करण्यात आलं. स्टारडम असलेल्या अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी तिथेही गर्दी झाली होती. अल्लू अर्जुनला पाहून त्यावेळीही चाहत्यांनी आरडाओरड सुरू केली. एका सर्वसामान्य आरोपीप्रमाणे अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली. तसेच त्याला शासकीय रुग्णालयातही मेडिकल टेस्टसाठी नेण्यात आलं. या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. अल्लू अर्जुनला 14 दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. आता 14 दिवस अल्लू अर्जुन हैदराबाद पोलिसांच्या ताब्यात असणार आहे. त्याची चौकशी होणार आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता त्याच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
मोठी बातमी! अल्लू अर्जुनला चौदा दिवसांची पोलिस कोठडी
