| मुंबई | प्रतिनिधी |
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आज मंगळवारी (दि.13) दुपारी 12.30 वा. भाजपा प्रदेश नरिमन पॉइंट कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितित पक्ष प्रवेश करणार असल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे.
अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांचा भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले होते. दोन दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करू, असे त्यांनी सांगितले होते. तर, आज अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. म्हणून भाजपच्या कार्यालयात जय्यत तयारी चालू आहे.