मोठी बातमी! रोह्यातील भुवनेश्वरमध्ये सिलेंडरचा स्फोट;तिघे जखमी

| धाटाव | शशिकांत मोरे |
रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील कालवा रस्ता भुवनेश्वर येथील रहिवासी मनोहर अंबाजी घोसाळकर यांच्या घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि.13) घडली. सिलेंडरच्या स्फोटात मनोहर घोसाळकर यांच्यासह अन्य दोघेजण जखमी झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, सिलेंडर स्फोटाची माहिती समजताच अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यातील जखमींना अधिक उपचारार्थ मुंबईला हलविण्यात आल्याची माहिती रोहा पोलिसांनी दिली.

भुवनेश्वर कालवा रस्ता येथील रहिवासी मनोहर घोसाळकर यांच्या घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याचे समोर आले. सिलेंडरच्या स्फोटात मनोहर घोसाळकर, सायली घोसाळकर, भावना घोसाळकर गंभीर जखमी झाले. तसेच घर, घरातील साहित्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. स्फोटानंतर शेजारी व नागरिकांनी वेळीच सतर्कता दाखवत आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला.

या घटनेचा अधिक तपास रोहा पोलीस करीत आहेत. दरम्यान, ऐन दिवाळी सणात दुर्दैवी घटना घडल्याने घोसाळकर कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले आहे, तर नागरिकांनी घोसाळकर कुटुंबाला सहकार्य करावे, असे आवाहन परीट समाजाचे रायगड जिल्हा युवा अध्यक्ष रविंद्र कान्हेकर यांनी केले आहे.

Exit mobile version