मोठी बातमी! दादा भुसे आणि आ. महेंद्र थोरवे यांच्यात राडा

| मुंबई | प्रतिनिधी |

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचेच दोन आमदार आपापसात भिडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्येष्ठ मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात हमरीतुमरी झाल्याचं वृत्त आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. यावेळी विधिमंडळाच्या लॉबीतच दोघांमध्ये राडा झाल्याचं वृत्त आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर भाष्य करणं टाळलं. तर, मंत्री शंभूराज देसाई यांनी ही घटना घडली नसल्याचा दावा केला आहे.

Exit mobile version