। मुंबई । वृत्तसंस्था ।
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत. याबाबत इतक्या गोंधळानंतरही स्पष्टता आलेली नव्हती. आता मात्र खुद्द शिंदे यांच्याकडूनच त्यांच्यासोबत असलेल्या यादीची घोषणा केली आहे. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 3६ आमदार असल्याचा दावा केला जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे शिवसेनेचे आमदार
1) एकनाथ शिंदे
2) अनिल बाबर
3) शंभूराजे देसाई
4) महेश शिंदे
5) शहाजी पाटील
6) महेंद्र थोरवे
7) भरतशेठ गोगावले
8) महेंद्र दळवी
9) प्रकाश अबिटकर
10) डॉ. बालाजी किणीकर
11) ज्ञानराज चौगुले
12) प्रा. रमेश बोरनारे
13) तानाजी सावंत
14) संदीपान भुमरे
15) अब्दुल सत्तार नबी
16) प्रकाश सुर्वे
17) बालाजी कल्याणकर
18) संजय शिरसाट
19) प्रदीप जयस्वाल
20) संजय रायमुलकर
21) संजय गायकवाड
22) विश्वनाथ भोईर
23) शांताराम मोरे
24) श्रीनिवास वनगा
25) किशोरअप्पा पाटील
26) सुहास कांदे
27) चिमणआबा पाटील
28) सौ. लता सोनावणे
29) प्रताप सरनाईक
30) सौ. यामिनी जाधव
31) योगेश कदम
32) गुलाबराव पाटील
33) मंगेश कुडाळकर
34) सदा सरवणकर
35) दीपक केसरकर
36) दादा भुसे
शिवसेनेत आमदारांचे बंड घडवून आणणारे एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये शक्तिप्रदर्शन केले आहे. आता आगामी दिवसात मोठ्या राजकीय हालचाली होण्याची शक्यता आहे. आज, मुंबईत ‘वर्षा’ बंगल्यावर शिवसेना नेत्यांची आणि आमदारांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत शिवसेनेचे 17 आमदार उपस्थित आहेत. त्यापैकी आदित्य ठाकरे हे मातोश्री बंगल्यावरून आणि संतोष बांगर हे मतदारसंघातून ऑनलाइन पद्धतीने बैठकीसाठी उपस्थित आहेत.