पश्चिम रेल्वे सेवा विस्कळीत
। मुंबई । वृत्तसंस्था ।
पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल येथे बुधवारी सकाळी 11ः20च्या सुमारास लोकल रुळावरून घसरली. ही लोकल कारशेडमध्ये जात होती. त्यामुळे लोकलमध्ये प्रवासी नव्हते. या घटनेमुळे पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत झाली. मध्य रेल्वेवरील पनवेल-कळंबोली येथे नुकतीच मालगाडी घसरल्याची घटना घडली होती.
पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल कारशेडमध्ये रिकामी लोकल जात असताना तिचे एक चाक रेल्वे रुळावरून घसरले. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरार लोकल सेवा 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहे. तसेच, सर्व डाऊन धीम्या लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.