मोठी बातमी! कार्लेखिंडीत ट्रेलरचा अपघात; वाहनचालकांची गैरसोय

| सोगाव | वार्ताहर |

गेल्या काही दिवसांपासून अलिबाग वडखळ मार्गावर अवजड वाहनांची संख्या अधिक प्रमाणात वाढली आहे. सोमवार दि.11 रोजी दुपारच्या सुमारास वडखळ बाजूकडून अलिबागकडे अवजड साहित्य घेऊन येणारा ट्रेलर (एमएच-46-बीएफ-6794) हा कार्लेखिंडीतील चढणीवरून अलिबागकडे जात असताना अपघात होऊन तो रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक कार्लेखिंड-परहूर पाडा-कनकेश्वर फाटा मार्गे वळवण्यात आली आहे. तरी, अलिबाग वडखळ मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची व वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे.

Exit mobile version