गतिरोधकासमोरच मोठमोठे खड्डे

वाहनचालकांची मोठी कसरत

। सुतारवाडी । वार्ताहर ।

सुतारवाडीपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या हेटवणे गावासमोर गतिरोधक आहेत. मात्र, या गतिरोधकाजवळ मोठमोठे खड्डे निर्माण झाल्या असल्यामुळे वाहनचालकाला मोठी कसरत करून मार्ग काढावा लागत आहे. यावेळी खड्डा चुकवण्याच्या नादात वाहनांची समोरासमोर धडक होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. याकडे कोणीही शासकीय अधिकरी लक्ष देत नसल्यामुळे वाहन चालकांना मोठा धोका निर्माण झालेला आहे.

कोलाड-सुतारवाडी या मार्गावरून सातत्याने लहान मोठी वाहने त्याचप्रमाणे अवजड वाहने ये-जा करत असल्यामुळे सुसज्ज असलेला रस्ता आता खड्डेमय होत चाललेला आहे. रात्री या मार्गावरून एखादे वाहन विशेषतः दुचाकीचालक जात असेल तर त्याला खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे वाहने खड्ड्यात आपटून अपघात होऊ शकतो. यामुळे येथील खड्डे भरणे अत्यंत आवश्यक आहे. कोलाड-सुतारवाडी मार्गे पुण्याकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्यामुळे या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. त्याचप्रमाणे सुतारवाडी परिसरात अनेक फार्म हाऊस असल्यामुळे पर्यटकही मोठ्या प्रमाणावर येत असतात. तरी संबंधित अधिकारी वर्गाने लक्ष देऊन हे खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.

Exit mobile version