| कोल्हापूर | वृत्तसंस्था |
शहरासह जिल्ह्यातही जोरदार बरसणाऱ्या पावसाने आज काहीशी विश्रांती घेतली. धरणक्षेत्रात मात्र पावसाचा जोर कायम होता. गेल्या २४ तासांत पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत सुमारे 7 फुटांची वाढ झाली. जिल्ह्यातील 33 बंधारे सध्या पाण्याखाली आहेत. 24 तासांत नदीची पाणीपातळी सुमारे सहा फुटांनी वाढली. रविवारी सकाळी 23 फुटांवर असणारी पाणीपातळी काल रात्री 10 वाजता 29 फुटांपर्यंत वाढली.
पाण्याखालील बंधारे
शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, कुर्तनवाडी, चंदगड व हल्लारवाडी, कुरणी, बस्तवडे व चिखली, साळगांव, दत्तवाड, येवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, वालोली, बाजार भोगाव, पेंडाखळे, करंजफेण व कांटे, चिंचोली, माणगांव, कोडोली व खोची, सरकारी कोगे व हळदी, शेनवडे, मांडुकली व कळे असे एकूण ३३ बंधारे पाण्याखाली आहेत.