एसबीआयच्या कर्जधारकांना मोठा धक्का

। मुंबई । प्रतिनिधी।
देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या भारतीय स्टेट बँकेची गृह कर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जे महागली आहेत. १५ एप्रिल २०२२ पासून नवे व्याजदर लागू झाले असून ‘एसबीआय’च्या संकेतस्थळावर कर्जाचे व्याजदर जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार एका रात्रीसाठीचा कर्ज दर (एमसीएलआर) हा ६.७५ टक्के आहे. त्याशिवाय एक महिन्यासाठी, तीन महिन्यांसाठी आणि सहा महिन्यांसाठी एमसीएलआर अनुक्रमे ६.७५ टक्के, ६.७५ टक्के आणि ७.०५ टक्के इतका आहे.त्याशिवाय मध्यम कालावधीत कर्जांसाठीच्या व्याजदरात देखील वाढ झाली आहे. बँकेचा एक वर्षासाठीचा एमसीएलआर दर ७.१० टक्के इतका आहे. दोन वर्षांसाठी तो ७.३० टक्के असून तीन वर्षांसाठी ग्राहकांना एमसीएलआर ७.४० टक्के इतका लागू होणार आहे. कर्जदर वाढल्याने ग्राहकांना ‘एसबीआय’चे गृह कर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जासाठी जादा दराने घ्यावी लागतील.

Exit mobile version