बायज्यूसची शाहरुखकडे पाठ

। मुंबई । वृत्तसंस्था ।
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील आरोपी आर्यन खानचे वडील बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, देशातील सर्वात मोठी एडटेक स्टार्ट-अप कंपनी बायज्यूसने शाहरुख खानच्या सर्व जाहिराती बंद केल्या असून त्याच्यासह असणारे सर्व व्यापारी करार तोडले आहेत.
ऍडव्हान्स बुकिंग असूनही बायज्यूसने शाहरुख खानच्या सर्व जाहिराती बंद केल्या आहेत. किंग खानच्या स्पॉन्सरशिप डील्समध्ये बायज्यूस हा सर्वात मोठा ब्रँड होता. याशिवाय शाहरुख खानकडे हुंदाई, रिलायन्स जिओ, एलजी, दुबई टुरिझमसारख्या कंपन्यांच्या जाहिराती आहेत. एका अहवालानुसार, 2017 पासून शाहरुख खान बायज्यूसचा ब्रँड अँबेसिडर असून त्यास ब्रँडला एंडोर्स करण्यासाठी वर्षाला 3-4 कोटी रुपये देण्यात येतात.

Exit mobile version