अलिबाग-रोहा मार्गावर दुचाकीचा अपघात; एकाचा मृत्यू

| अलिबाग | प्रतिनिधी |

रोहा मार्गावरील मल्याण फाटा येथे दोन वाहनांच्या धडकेत दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. यातील एका तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहीती पोलीसांनी दिली.

रविवारी (दि.17) सकाळी चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा अपघात मल्याण फाट्याजवळ झाला होता. या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले. दुचाकीचे देखील प्रचंड नुकसान झाले होते. जखमींना अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्यांना अधिक उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून दुसरा उपचार घेत असल्याची माहीती रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल अतिग्रे यांनी दिली.

Exit mobile version