अपघातात दुचाकीस्वार ठार

। पनवेल । वार्ताहर ।

महानगरपालिकेच्या घंटा गाडीने दुचाकीस्वाराला धडक दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत दुचाकी चालक जागीच ठार झाला आहे. अंजनीकुमार मौर्या (22) असे मृत तरुणाचे नाव असुन खारघर हिरानंदानी उड्डाणपुलाजवळ हा अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच खारघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी वाहन चालक विकास पाटील (44) याला खारघर पोलिसांनी अटक केली आहे. अंजनीकुमार मौर्या हा स्वीगी फुड अ‍ॅपसाठी काम करत होता. दरम्यान, शहरातील स्विगी चालकांनी खारघर पोलीस ठाण्यात धडक देण्याचा प्रयत्न केला.

Exit mobile version