तब्बल 16 सायकली केल्या हस्तगत
| पनवेल | प्रतिनिधी |
नवीन पनवेल परिसरात रहिवासी सोसायटीमधील लॉक न करता उभ्या केलेल्या तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या वेगवेेगळ्या ठिकाणांवरील 16 सायकली चोरणार्या विधीसंघर्षग्रस्त बालकास खांदेश्वर पोलिसांनी ताब्यात घेेतले असून, त्याच्याकडून जवळपास 1 लाख 35 हजाार रुपये किमतीच्या एकूण 16 रेंजर सायकली हस्तगत केल्या आहेत.
गेल्या काही दिवसापासून नवीन पनवेल, खांंदेश्वर परिसरात महागड्या सायकली चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. यासंदर्भात अरुणकुमार गोस्वामी यांनी खांदेश्वर पोेलीस ठाण्यात सायकल चोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार पोलीस उपायुक्त परि 02, विवेक पानसरे, सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग अशोक राजपूत, वपोनि चंद्रकांत लांडगे, पोलीस निरीक्षक गुन्हे संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि चासकर, पोह अमित पाटील, पोह उदय देसाई, पोशि सचिन पवार, पोशि स्वप्नील कोळी यांनी गोपनिय बातमीदार यांच्या मदतीने सदर मुलाची माहिती घेऊन या गुन्ह्यात एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. तपासामध्ये त्याच्याकडून एक लाख 35 हजारांच्या एकूण 16 रेंजर सायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहे.