। पनवेल । प्रतिनिधी ।
अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार खाली पडला असता त्याच्या अंगावरून वाहन गेल्याने त्याचा चिरडून मृत्यू झाला. मोहम्मद हरून इमाम अली असे मृताचे नाव आहे. बरकत अली चौधरी याने त्याचा मित्र सत्यप्रकाश याला मॅरेथॉन पळस्पे फाटा येथे सोडल्यानंतर मोहम्मद हरून याला फोन केला. यावेळी दुसऱ्या व्यक्तीने फोन उचलून मोहम्मद हरून इमाम अली हा त्याच्या दुचाकीने जात असताना मुंबई-पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाने त्याच्या मोटारसायकलला धडक दिली आणि यात त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.






