| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील ओरायन मॉल समोरील पनवेल सायन हायवे ब्रिजवर अज्ञात वाहनाच्या धडकेने एका 35 ते 40 वर्ष वयाच्या अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पनवेल शहर पोलीस सदर अज्ञात मयत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. पनवेल सायन हायवे ब्रिजवर ओरायन मॉल समोर एका अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत असून, याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे किंवा सहा पोलीस निरीक्षक सारिका झाजुर्गे (मो. 8422999428) यांच्याशी संपर्क साधावा.
अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू
