। रसायनी । वार्ताहर ।
कोन-रसायनी सावळामार्गे जाणाऱ्या मार्गावर जाताडे येथे वळणावर दुचाकी नियंत्रित न झाल्याने झाडाला धडकून झालेल्या अपघातात गुळसुंदे रसायनी येथील केतन जाधव (28) याचा मृत्यू झाला. ही दुर्घटना सोमवारी मध्यरात्री घडली.
रसायनी पोलीस ठाणे हद्दीत सावळा ते वावेघर रस्त्यावर जाताडे वळणावर भरधाव वेगात दुचाकी घेवून जात असताना केतन जाधव याचे आपल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन आदळला. यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत रसायनी पोलीस ठाण्याचे पोसई माळी हे अधिक तपास करीत आहेत.
भीषण अपघात! झाडाला धडकून दुचाकीस्वार ठार
