। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी येथील अमीर मुकादम (35) या तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत शुक्रवारी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकावर देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमीर मुकादम कामानिमित्त शुक्रवारी दुपारी आपल्या दुचाकीवरून तुळसणीहून बावनदीच्या दिशेने जात होता. देवरुख-रत्नागिरी मार्गावरील वायंगणे फाटा येथे अज्ञात वाहनाने अमीर याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीसह अमीर रस्त्यावर कोसळला. या मार्गावरून ये-जा करणार्या स्थानिकांना दुचाकी व अमीर पडलेला दिसून आला. त्याला तात्काळ उपचारासाठी रत्नागिरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करून अमीर याला मृत घोषित केले. याची माहिती अजय सुर्वे यांनी देवरुख पोलीस ठाण्यात दिली. या अपघात प्रकरणी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.