अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल-उरण मार्गावर करंजाडे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार चिन्मय पाटील (22) याचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र निर्भय भगत (21) गंभीर जखमी झाला आहे. चिन्मय आणि निर्भय हे दोघे दुचाकीवरून पनवेल उरण रोडवरून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातानंतर दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान चिन्मयचा मृत्यू झाला. पनवेल शहर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे.

Exit mobile version