• Login
Wednesday, February 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

वणव्यांमुळे जैवविविधता व ऐतिहासिक वारसे धोक्यात

Krushival by Krushival
February 27, 2024
in रायगड, सुधागड- पाली
0 0
0
वणव्यांमुळे जैवविविधता व ऐतिहासिक वारसे धोक्यात
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पाली/बेणसे | वार्ताहर |

पश्चिम घाटाचा विस्तिर्ण पट्टा, विपुल जैवविविधता व डोंगरदऱ्यांनी वेढलेला आणि एैतिहासिक वारशांचा ठेवा म्हणून रायगड जिल्हा ओळखला जातो. मात्र येथे वारंवार लागणाऱ्या वणव्यामुळे जैवविविधता, वनसंपदा व पशू-पक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शिवाय मालमत्ता देखील नष्ट होते. पाली खोपोली राज्य महामार्गावर दापोडे गावाजवळील मांढरे पेट्रोल पंपासमोर भंगार व जुन्या लाकडाच्या गोदामाला मंगळवारी (दि.20) दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली होती. ही आग वणव्यामुळे लागली होती. या आगीत दोन्ही गोदामातील सामान व गोदामाबाहेर उभी असलेली तीनचाकी जळून खाक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. तर पालीतील सरसगड किल्ल्यावर बुधवारी (दि.21) मोठा वणवा लागला होता. या वणव्यामुळे किल्ल्याचा बहुतांश भाग जळून होरपळला. यामध्ये किल्ल्यावर नव्याने लावलेले रोपे व संवर्धन केलेली झाडे जळाली आहेत. हा वणवा वनक्षेत्रपाल विकास तरसे व वनपाल यांच्या आदेशाने वनरक्षक विनोद चव्हाण, वनरक्षक संकेत गायकवाड, वनमजुर पांडुरंग पवार, गोविंद लांगी, नामदेव पुंजारे आदि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून विझवला. त्यामुळे मोठे नुकसान टळले. तसेच वणवा मानवी वस्तीत पोहचला नाही. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.

मागील वर्षापूर्वी माणगाव तालुक्यातील विळे भागाड एमआयडीसी भागातील डोंगरावर व माळरानावर प्रचंड मोठा वणवा लागला होता. येथील स्थानिक पर्यावरण व निसर्ग अभ्यासक राम मुंढे यांनी या भागाची पाहणी केली असता या वनव्यामध्ये ठिपकेवाली मुनिया आणि इतर पक्षांची घरटी पूर्णपणे जळून गेली आहेत. शिवाय पूर्ण विकसित झालेली अंडी देखील जळाली आहेत. पक्षांचा अधिवास व खाद्य देखील नष्ट झाले आहे. अशाच प्रकारचे वणवे ठिकठिकाणी लागणे सुरू झाले आहे.
जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक वास्तू आणि किल्ल्यांवरील हे वणवे या ऐतिहासिक वस्तूंना देखील नुकसान पोहचवत आहेत. सध्या अशा वणव्यांना मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. गवत जळल्याने गवतावर अवलंबुन असणाऱ्या गुरे-ढोरांवर उपासमारीची वेळ येते. मोठ्या प्रमाणात सजीव सृष्टीचे नुकसान होते. या वणव्यांवर नियंत्रण आणणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच, संबधीत विभागाने व नागरिकांनी हि बाब गंभीरतेने घेवून तत्काळ उपायोजना करणे आवश्यक आहे.

बहुतांश वणवे हे मानवनिर्मित असतात. नोव्हेंबर अखेरपासून व मार्च नंतर पानगळ सुरू झाल्यावर जिल्ह्यात वणवे लागतात. यावेळी पक्षांचा विणीचा हंगाम असतो. त्यामुळे पक्षी, त्यांचा अधिवास, त्यांची पिल्ले आणि अंडी नष्ट होतात. तसेच, वणव्यामुळे महत्वाची जैवविविधता धोक्यात येते. वणव्यांमुळे जमिनीवरील गवत, झुडुपे जळून जातात. वणवे रोखण्यासाठी वन विभागाकडून जनजागृती व प्रबोधन केले जाते. अत्याधुनिक फायर ब्लोअर द्वारे वणवे विझविले जातात. जळरेषा काढली जाते.

समीर शिंदे, वनक्षेत्रपाल,
कांदळवन, अलिबाग
सजीव सृष्टीला धोका
नैसर्गिक व कृत्रिम वणव्यांमुळे सजीव सृष्टी धोक्यात येते. पर्यावरणाची प्रचंड हानी होते. प्रदुषण वाढते. येथील महत्वपूर्ण जैवविविधता संपुष्टात येते. सरटणारे जीव, किटक आणि झाडे-झुडपे, औषधी वनस्पती आगीमध्ये भस्मसात होतात. विवीध प्राण्यांचे व पक्षांचे आसरे-निवारे संपुष्टात येतात. त्यांची पिल्ले देखिल या आगीत होरपळून मरतात. तसेच पक्षांचे आणि गुरे-ढोरांचे अन्न नष्ट झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते. दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींना देखिल या आगीमुळे धोका संभवतो.
ऐतिहासिक वास्तू व किल्यांचे नुकसान
वणव्यांमुळे जिल्ह्यातील अनेक छोटे-मोठे गड-किल्ल्यांचे व ऐतिहासिक ठेव्यांचे बांधकाम कमकुवत होवुन ते ढासळण्याची भिती असते. किल्याच्या तटबंदीवर, बरुजांवर उगवलेले गवत जळाल्यामुळे त्यांचे नुकसान होते. वणवे लागल्यामूळे किल्ले व ऐतिहासिक वास्तूंवरील मोठ्या प्रमाणात वनसंपदा देखील नष्ट होत आहे. परिणामी या ठिकाणी वणवे लागणार नाहीत याची दक्षता व खबरदारी सर्वांनीच घेतली पाहिजे.
ठोस उपाययोजनांची गरज
कृत्रिम वणव्यांमुळे संपुर्ण सजिवसृष्टी धोक्यात येते. पर्यावरणाचा-हास होतो. त्यामुळे वणवे रोखण्यासाठी वनविभागाच्या माध्यमातून विविध उपाय व जनजागृती केली जाते. तसेच, काही वेळेला विद्यार्थी पथनाट्य सादर करतात. मात्र, हे प्रयत्न अपुरे आहेत. या उपयांबरोबरच स्थानिक लोकांना व आदिवासींना वणव्याचे दुष्परिणाम सांगून त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. यासाठी गाव समिती निर्माण केली पाहिजे. प्रामुख्याने वनविभाग, निसर्गप्रेमी व आदिवासी विदयार्थ्यांच्या मदतीने जनजागृती करण्याची गरज आहे. लोकांनी देखील स्वयंस्फूर्तीने वणवे रोखणे व स्वतः लावणार नाही यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. याबाबत शाळा स्थरावर व वनविभागाच्या माध्यमातून प्रबोधन व जनजागृती करत असल्याचे विळे येथील शिक्षक राम मुंडे यांनी सांगितले.

Related

Tags: Biodiversity endsDamage caused by forest firesDamage to historical structures and fortsDamage to living creaturesindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspali benseraigadsocial media newssocial newswildfire
Previous Post

करवसुलीसाठी ‘महसूल’ची धडपड; महिनाभरात गाठावा लागणार लक्षांक

Next Post

महेंद्र घरत यांच्या मध्यस्थीने चालकांचा प्रश्न मार्गी

Krushival

Krushival

Related Posts

शिवजयंतीला सरसगडावर प्रदक्षिणेचे आयोजन
रायगड

शिवजयंतीला सरसगडावर प्रदक्षिणेचे आयोजन

February 17, 2026
पनवेल

खारघरमध्ये बेकायदा बांधकामांवर कारवाई

February 17, 2026
पात्र शिक्षकांना परीक्षेतून सुट द्यावी
महाड

पात्र शिक्षकांना परीक्षेतून सुट द्यावी

February 17, 2026
रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान
रायगड

रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान

February 17, 2026
मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी
अलिबाग

मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी

February 17, 2026
पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश
अलिबाग

पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश

February 17, 2026
Next Post
महेंद्र घरत यांच्या मध्यस्थीने चालकांचा प्रश्न मार्गी

महेंद्र घरत यांच्या मध्यस्थीने चालकांचा प्रश्न मार्गी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?