| कोर्लई | प्रतिनिधी |
मुरुड- जंजिरा पर्यटनात प्रसिद्ध असलेल्या मुरुड तालुक्यातील फणसाड वन्यजीव अभयारण्यात ग्रीन वर्क ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सहाय्यक वनसंरक्षक मनोहर दिवेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षी निरीक्षण कार्यक्रम घेण्यात आला.

ठाणे-ग्रीन वर्क ट्रस्टचे संचालक निखिल भोपाळे यांची टीम, फणसाड अभयारण्याचे वनपाल हरिश्चंद्र नाईक, वनरक्षक, वनमजूर यांनी पक्षी प्रजाती ओळख, माहिती, आवाज, दिसलेल्या पक्ष्यांची नोंद घेण्यात आली. यावेळी पक्षी निरीक्षणात सर्प गरुड, शिक्रा, हरियाल, वेडा राघू, नील माशिमार, बगळा, सातभाई, कोतवाल, धनेश, शेंडी गरुड, खाटिक आदी पक्षी आढळून आले.







