सुशोभीकरणांस मात्र पक्षी मित्रांचा विरोध
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
विविध प्रजातीच्या रंगीबेरंगी पक्षांचे निरीक्षण आणि अभ्यास करणार्या पक्षी निरीक्षकांना पनवेल शहरातील वडाळे तलावात पहिल्यांदाच रंगीत पाणलावा पक्षाचे दर्शन झाले आहे. तलावात येणार्या पक्षांचे नियमित निरक्षण करणारे माधव आठवले यांनी दिलेल्या माहिती नुसार मार्च ते मे महिन्याच्या कालावधीत विनीचा हंगाम असलेल्या या पक्षाच्या तीन जोड्या सध्या तलाव परिसरात पाहायला मिळाल्या असून, एका जोडीला चार पिल्ले देखील झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. शहरातील ऐतिहासिक तालावच्या सुशोभीकरणाचे काम पालिका प्रशासनाकडून काही वर्षापासून हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे तलावाचे इतिहासिक स्वरूप नष्ट होईल आणि तलावतील जैवविविधता नष्ट झाल्यास दर वर्षी तालावाला भेट देणारे प्रवाशी पक्षी तलावापासून दुरावातील या भीतीने निसर्ग प्रेमी धास्तावलेले असतानाच सुशोभीकरणाचे काम जवळपास पूर्ण करण्यात आलेल्या या तलावात विविध प्रजातीचे प्रवासी आणि अप्रवासी पक्षी दिसू लागल्याने पक्षी प्रेमी सुखावले असून, विविध प्रजातीच्या पक्षांचे निरीक्षण करण्यासाठी आणि त्यांची छायाचित्र आपल्या कॅमेर्यात कैद करण्यासाठी पक्षी निरीक्षक वडाळे तलाव परिसरात गर्दी करताना दिसून येत आहेत.
सद्य स्थितीत वडाळे तलावात रंगीत पानलावा पक्षाच्या तीन जोड्या पक्षी निरंक्षकांच्या दृष्टीस पडल्या आहेत. त्या पैकी एका जोडीला चार पिल्ले झाली असल्याचे आणि नर पक्षी त्यांचे पालन पोषण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. विनीच्या हंगामानंतर मादी अंडी देते. अंडी दिल्यानंतर मादी दुसर्या नराच्या शोधात जात असल्याने अंडी उबवण्याची आणि पिल्लं वाढवण्याची जवाबदारी नर पक्षावर येत असतात.
माधव आठवल
पक्षी निरीक्षक
तलावतील सुशोभीकरणांस विरोध
प्रशासनाकडून तलावाभोवती सुरु असलेल्या कामाला निसर्ग प्रेमीचा विरोध नाही. मात्र तलावात पात्रात करण्यात येत असलेल्या सुशोभीकरणा दरम्यान तलावतील गवत काढले जात असल्याने पक्षांच्या आश्रय स्थळांना धोका पोहचण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे तलवाभोवती आणि तलावात लावण्यात आलेल्या एलइडीच्या विद्युत रोषणाई मुळे पक्षांना त्रास होण्याची शक्यता असल्याने पात्रातील सुशोभीकरणांस पक्षी मित्रांचा विरोध असल्याचे मत माधव आठवले यांनी व्यक्त केले आहे.