| रसायनी | प्रतिनिधी |
तुपगांव गावामध्ये बिर्ला कार्बन कंपनीकडून जलशुद्धीकरण केंद्रासाठी पिण्याच्या पाण्याचा फिल्टर प्लांट बसविण्यात आला. या कार्यासाठी गावातील समाजसेवक दिलीप साळुंखे, सचिन कालेकर,अविनाश दळवी यांनी प्रयत्न केले. जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन रविवारी (दि.23) तुपगावचे सरपंच रवींद्र कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रोहिणी गुरव, कांता नागावकर, देविदास गुरव, मनोज गुरव, रमेश दळवी, कन्हैयालाल विश्वकर्मा, संजय गुरव, हनुमान गुरव, रचना गुरव, जनार्दन गुरव, मिलिंद शिंदे, अल्पेश दळवी आदी उपस्थित होते. या अगोदरही बिर्ला कंपनीच्या माध्यमातून गावामध्ये विद्यार्थ्यांसाठी बस स्टॅन्ड, स्वामी समर्थ मठ, शंकर मंदिर, मारुती मंदिर येथे सौर दिवे बसविण्यात आले आहेत.







