| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा येथील यू इंग्लिश स्कूलमध्ये ‘जन जातीय गौरव दिन’ म्हणजेच क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांना 150 व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य डी.आर. पाटील यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना अधिक माहिती करून दिली. तसेच, विद्यार्थी मनोगतात दिया ओसवाल, त्रिशाला चव्हाण, लावण्या साळुंखे,वैभव कामडी, मनस्वी म्हशिलकर, दैविक पवार, हर्ष ओसवाल, दूर्वा घोलप, अंश मोहिते, पायल प्रजापती,पल्लवी गांगुर्डे, सृष्टी खैरनार आदी विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनावर व कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. तसेच, शिक्षक मनोगतात एस.ए वसावे यांनी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या कार्याची ओळख करून आदिवासी समाजासाठी त्यांचे योगदान काय होते हे पटवून दिले. तसेच, 1 ते 15 नोव्हेंबरपर्यंत ‘जनजातीय गौरव पंधरवडा’ साजरा करण्याचे नियोजन करून त्यात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी ज्येष्ठ शिक्षक ई.सी पाटील, एन.एम गर्जे, एच.बी. मोरे, आर.डी. पाटील, एल.पी. सहारे, आर.डी. गांगुर्डे,आमले, डी.सी. खोकले, एम.सी.गवळी, एन एस, तडवी आदि मान्यवर उपस्थित होते.
बिरसा मुंडा यांना अभिवादन
