आ.जयंत पाटील, पंडित पाटील यांची प्रमुख उपस्थिती
| पेझारी | वार्ताहर |
शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा जीवनाच्या अंतापर्यंत आपल्या खांद्यावर घेऊन आपले संपूर्ण आयुष्य गोरगरीब, दलित, आदिवासी, कष्टकरी, सर्व जाती धर्मीय जनतेसाठी ज्यांनी चंदनाप्रमाणे झिजविले अशा कोकण केसरी, रायगडचे भाग्यविधाते स्वर्गीय प्रभाकर पाटील तथा भाऊ यांची जयंती सोहळा पेझारी येथील को.ए.सो.ना.ना.पाटील संकुलामध्ये अत्यंत उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला. स्मारकातील भाऊंच्या अर्धकृती पुतळ्यासमोर देवेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.
जयंती सोहळानिमित्ताने आ. जयंत पाटील, पंडित पाटील, सुप्रिया पाटील, भावना पाटील, अॅड. आस्वाद पाटील, नृपाल पाटील, चित्रा पाटील, द्वारकानाथ नाईक, सुरेश म्हात्रे, एस पी ठाकूर, सुरेश खोत, प्रशांत जाधव, शरद वरसोलकर, यशवंत पाटील, स्वप्निल पाटील, कमला म्हात्रे, सुनील राऊत, प्रकाश म्हात्रे, मंचुके, अनिल पाटील हळदवणेकर, औदुंबर रणदिवे, आर के पाटील, दीपक कुलकर्णी, विकास पाटील, शैलजा पाटील, सिद्धनाथ पाटील, अनिल पाटील, शशिकांत पाटील, सर्व शाखांतील प्रमुख, सर्व शाखांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पोयनाड विभागातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्यकर्ते संकुलातील सर्व आजी-माजी विद्यार्थी, माता-पिता पालक वर्ग यांनी भाऊंच्या प्रतिमेस अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला को. ए.सो.ना.ना.पाटील ढोल पथक, एनसीसी, आरएसपी पथक यांनी स्वर्गीय भाऊंना मानवंदना दिली. त्यानंतर दीपप्रज्वलन होऊन भाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संगीत शिक्षक राजेंद्र म्हात्रे व सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इशस्तवन, स्वागतगीत आणि भाऊंचे गौरवशाली कार्यकर्तृत्व अतिशय सुश्राव्य अशा गौरव गीतातून सादर केले.
स्वर्गीय भाऊ प्रभाकर पाटील यांचा जयंती सप्ताह संकुलामध्ये 17 जानेवारीपासून सुरू करण्यात आला. यानिमित्त शालेय परिसर, पेझारी, पोयनाड, अंबेपूर विभाग स्वच्छता अभियान, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमार्फत राबविण्यात आले. तसेच भाऊंच्या जीवनावर आधारित विषय देऊन गटवार वक्तृत्व स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. यामधील गुणवंत, यशवंत विद्यार्थ्यांना आकर्षक प्रशस्तीपत्रक आणि भेटवस्तू देऊन या कार्यक्रमात गौरविण्यात आले. तसेच वार्षिक निकालातील प्रत्येक इयत्तेतील प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना ही यावेळी पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली पाटील यांनी केले. पारितोषिक वाचन तुकाराम बर्गे यांनी केले तर आभार नम्रता भाटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी देवेंद्र पाटील, तृप्ती पिळवणकर, अनिल पाटील, राजेश स्वामी, सुवर्णा पाटील, उदय पाटील, समीर भोईर, आदिती वर्तक, निनाद पाटील तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.