। पनवेल । प्रतिनिधी ।
जनतेला उपयुक्त होतील अशा सामाजिक उपक्रमातुन आ. बाळाराम पाटील यांचा वाढदिवास कामोठे आणि कळंबोलीमध्ये साजरा करण्यात आला. शेतकरी कामगार पक्ष कामोठे आणि कळंबोली यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. मागील एक आठवड्यापासून पनवेल आणि उरण परिसरात शेकापच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम घेण्यात आले. विशेष म्हणजे कामोठे येथे रक्तदात्यांना चांदीचे नाणे देण्यात आले. या वर्षी वाढदिवस साजरा करायचा नाही, असा निर्णय घेण्यात आला होता.
![](http://krushival.in/grygrars/2021/12/WhatsApp-Image-2021-12-30-at-5.37.48-AM-1-1-1024x768.jpeg)
त्यानूसार 29 डिसेंबर रोजी पक्षाच्या वतीने रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, नेत्र चिकित्सा शिबीर, चष्मे वाटप, रुग्णांना फळ वाटप, वृद्धाश्रम रहिवासीयांना चादरी आणि फळ वाटप, पिशवी वाटप, गार्डनची साफसफाई करणे, गणेश घाटाचे साफसफाई करणे, पुस्तक कट्टयाचे उदघाटन, बस निवाराचे उदघाटन, साम्प्रादायिक किर्तनाचा आयोजन, असे अनेक कार्यक्रम करण्यात आले. याबाबत आ. बाळाराम पाटील यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानत जनतेशी संवाद साधला.
![](http://krushival.in/grygrars/2021/12/WhatsApp-Image-2021-12-30-at-5.37.48-AM-2-1-1024x768.jpeg)
![](http://krushival.in/grygrars/2021/12/WhatsApp-Image-2021-12-30-at-5.37.48-AM-3-1-1024x768.jpeg)
यावेळी कामोठेमध्ये शेकापक्षचे जिल्हा सहसचिव व माजी नगरसेवक शंकर म्हात्रे, जिल्हा प्रवक्ता मधुकर सुरते, नगरसेवक सखाराम पाटील, नगरसेविका सारिका भगत, पनवेल पंचायत समिती माजी सभापती प्रमोद भगत, कामोठे शहर अध्यक्ष अमोल शितोळे, कार्यअध्यक्ष गौरव पोरवाल, वरिष्ठ कार्यकर्ता अर्जुन डांगे, महिला कार्यकर्ते शुभांगी खरात, जयश्री राठोड, पिंकी शर्मा कार्यकर्ता लक्षमन भगत, रोशन यादव, अल्पेश माने, बापु साळुखे, डॉ. दशरथ माने, अनंत भगत, कुणाल भेंडे, रमेश गोरे, रोशन भालचंद्र म्हात्रे, विश्वास भगत, कळंबोलीमध्ये शेकापक्षचे नगरसेवक गोपाळ भगत, रवींद्र भगत, नगरसेविका प्रिया भोईर, प्रदिती म्हात्रे, युवा अध्यक्ष कळंबोली अमोल सातपुते, युवा नेते भाऊसाहेब संपत रौंधळ आदी यांच्या सहकार्याने उपक्रम घेण्यात आले.