नागरिकांना घरात बसवुन अधिकार्‍यांच्या रंगतायत बर्थडे पार्ट्या

जिल्हाधिकारी महोदयांनी कारवाई करण्याची होतेय मागणी | श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांचे प्रमुख अधिकारी कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून बर्थडे पार्ट्या रंगवत असल्याचे चित्र दिसत आहेत.
नागरिकांना कोरोनाचे नियम पाळायला लावणारे स्वतः कोरोनाचे नियम न पाळता तोंडाला मास्क न लावता व सुरक्षित अंतर न ठेवता पार्ट्या रंगवत असतील तर सर्व सामान्य नागरिकांकडून काय अपेक्षा करता? अशी चर्चा सध्या श्रीवर्धनमध्ये नागरिक करत आहेत. दोन अधिकार्‍यांच्या वाढदिवसाच्या पार्टीनिमित्त जमलेल्या अधिकारी वर्गात एक अधिकारी असा आहे की त्यांच्याकडे दोन तालुक्यांचा कारभार आहे.

श्रीवर्धनमधील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी, वन विभागाचे अधिकारी, पोलीस ठाण्याचे ए पी आय, पंचायत समिती आदी तालुक्यातील महत्वाचे अधिकारी वाढदिवसानिमित्त एकत्र येतात. शासकीय कामच्यावेळी शासनाचे नियम पाळून सोशल इस्टन्स ठेऊन तर कधी ऑनलाइन मिटिंग घेणारे अधिकारी रात्री मात्र एकत्र येऊन पार्ट्या करतात. श्रीवर्धन मधील रुग्णसंख्येत वाढ होतेय म्हणून अधिक निर्बंध लागू करणारे अधिकारी नियमांची पायमल्ली करत असतील तर सर्व साधारण नागरिकांना नियम पाळण्यासाठी कोणत्या तोंडाने सांगणार? आसा सवाल नागरिक करत आहेत. तोंडाला मास्क न लावनार्‍यांवर कारवाईचा बडगा उभारणारे पोलीस देखील तोंडावर मास्क न लावता पार्टीत सहभागी होतात. आश्या अधिकारी वर्गावर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कारवाई करण्याची मागणी श्रीवर्धन मधील नागरिक करत आहेत.

Exit mobile version