| रसायनी | वार्ताहर |
राष्ट्रवादी रायगड जिल्हा महिला अध्यक्षा उमाताई मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला बचत गटांना रोजगारासाठी दळण मशिन व पापड मशिनचे वाटप करण्यात आले. दिव्यांग(अपंग) यांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. तर माजी सरपंच संदिप सुदाम मु़ंढे यांच्या प्रयत्नाने नवीन वसाहत येथे डजबिनचे वाटप करण्यात आले. तसेच जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंच लावण्यात आले. जनता विद्यालय शाळेच्या ध्वजाजवळ हायमास्ट लावण्यात आले.यानंतर नविन पोसरी हनुमान मंदिराच्या पटांगणात विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. तर महिलांसाठी हळदीकुंकू व गुरु कदम पुरस्कृत चला खेळूया पैठणीचा खेळ हा मनोरंजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला रसायनी परिसरातील असंख्य महिला होत्या.
उमाताई मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी उपस्थित राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी वाटपप्रसंगी संदिप मुंढे, सुदाम मु़ंढे, अशोक मुंढे, नयन कुरंगले, सचिन कुराडे, तुकाराम महाराज लोभी, मांडे महाराज, वृषाली म्हात्रे, वर्षा पाटील, रेश्मा चौधरी, मनाली शिंदे, विनया मुंढे, सोनाली गोपाळे. अंजना मुंढे, राजश्री जांभळे, शारदा काळे आदीसह परीसरातील पदाधिकारी, शिक्षकांसह नागरिक होते.