आयाराम-गयारामाच नशीब फळफळलं; महायुतीची उमेदवारी जाहीर

। मुंबई । प्रतिनिधी ।

भाजपकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठीचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजपने एकूण तीन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून भाजपात दाखल झालेलेल नेते अशोक चव्हाण, भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचा समावेश आहे. तसेच अजित गोपछडे यांना सुद्धा भाजपकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपकडून अधिकृतपणे उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संधी दिली जाणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे. कदाचित त्यांना लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात भाजप उतरवण्याच्या तयारीत असण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजप नेते विनोद तावडे यांच्यादेखील नावाची चर्चा होती. पण त्यांनाही संधी देण्यात आलेली नाही. तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही राज्यसभा निवडणुकीत संधी देण्यात आलेली नाही.

Exit mobile version