महिलेचा शारीरिक संबंध ठेवून बनविला अश्लील व्हिडीओ
भाजपच्या दक्षिण जिल्हाध्यक्ष महेश मोहितेंवर सोलापूरात गुन्हा दाखल
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड महेश मोहिते यांनी महिलेचा अश्लीश व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी दिल्याबाबत सोलापूर जिल्ह्यातील जोडभावी पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दाखल केली आहे. याबाबत जोडभावी पेठ पोलिसांनी महेश मोहिते यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसर्या महिलेशी मोहिते यांनी विवाह केला आहे. तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून अत्याचार केला आहे. मोहिते हे जिल्ह्याबाहेरील संशयित आरोपी असल्याने पेठ पोलिसांनी त्याच्या शोधासाठी उपायुक्त डॉ वैशाली कडुकर याच्याकडे परवानगीसाठी अर्ज केला आहे. अॅड महेश मोहिते हे भाजपाचे रायगड दक्षिण जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सध्या चर्चेचा विषय झाला आहे. याबाबत मोहिते याची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्याच्याशी संपर्क झाला नाही.
महेश मोहिते याचे पहिले लग्न झाले असून घटस्फोट झालेला नाही. पीडित महिलेचेही लग्न झाले असून तीचे पती मद्यपी असल्याने भांडण होत असे. एका सार्वजनिक कार्यक्रमात मोहिते आणि पीडित महिलेची ओळख झाली. त्यानंतर ओळख वाढून त्याच्या प्रेम निर्माण झाले. दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाल्याचे खोटे सांगून पीडित महिलेशी 6 ऑक्टोबर 2015 साली मुंबईत एका मंदिरात विवाह केला. त्यानंतर पनवेल येथे एका भाड्याच्या घरात दोघे राहू लागले. काही दिवसाने महेश मोहिते याचा घटस्फोट झाला नसल्याने पीडित महिलेला कळले. त्यानंतर त्याच्यात वाद निर्माण झाले. त्यानंतर महिलेने खांदेश्वर पोलीस ठाण्यात मोहिते विरोधात तक्रार दाखल केली. मात्र आपल्या पीडित महिलेची समजूत काढून फिर्याद मागे घेतली. त्यानंतर मोहिते हे 14 एप्रिल 2021 रोजी सोलापूर येथे पीडित महिलेच्या घरी गेले. त्यावेळी तिच्याशी अनैसर्गिक अत्याचार करून व्हिडीओ बनविला. आणि काही कुठे बोललीस तर व्हिडीओ व्हायरल करेल अशी धमकी दिली. अखेर पीडित महिलेने जोडभावी पेठ पोलीस ठाणे गाठून मोहिते यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनुसार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम करीत आहेत. मात्र या प्रकरणामुळे जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.