अलिबागमध्ये सोमवारी अलिबागमध्ये आयोजन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पुरस्कृत महाराष्ट्र राज्य पुरोगामी युवक संघटनेच्या मेळाव्याचे आयोजन सोमवार दि. 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आले आहे. अलिबाग चेंढरे येथील पीएनपी नाटयगृहात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्यासह माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एस व्ही. जाधव, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार धैर्यशिल पाटील, माजी आमदार पंडितशेठ पाटील, राज्याचे कार्यालयीन चिटणीस अॅड राजेंद्र कोरडे, डॉ. अनिकेत देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख, जिल्हा चिटणीस अॅड आस्वाद पाटील, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, महाराष्ट्रातील पक्षाचे प्रमुख नेते तसेच डाव्या चळवळीचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याला रायगड जिल्ह्यातील शेकापक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन अलिबाग तालुका पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष विक्रांत वार्डे यांनी केले आहे.