चाकरमान्यांवर भाजपची नजर

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

दक्षिण रायगडात निवडणुकांसाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरु केलेली आहे. जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते मुंबई उपनगर, वसई, विरार, नालासोपारा, डोंबिवली, कल्याण, नवी मुंबई या भागांत गेली 15-20 वर्षांत मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाले आहेत. या सर्वांना भाजप कोकण विकास आघाडीच्या माध्यमातून भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य कृष्णा कोबनाक यांच्या नेतृत्वाखाली तालुकानिहाय जबाबदारी देण्यात आली आहे.

याबाबत चर्चा करण्यासाठी मुंबईत भाजप कार्यालयात आ. आशिष शेलार यांचे मार्गदर्शनाखाली व कोकण विकास आघाडी अध्यक्ष सुहास अडविरेकर यांच्या मान्यतेने सर्व पदाधिकारी यांच्या तालुकानिहाय नेमणुका करण्यात आल्याचे कोबनाक यांनी जाहीर केले आहे. त्यामध्ये त्यापैकी काही नेमणुका पुढील सहसंपर्क प्रमुख रायगड: मदन केशव काजे, गोविंद भायदे, जिल्हा संपर्कप्रमुख महिला: शुभांगी सुर्वे, तालुकानिहाय संपर्कप्रमुख: म्हसळा – रघुनाथ भायदे श्रीवर्धन – संतोष साबळे, मुरुड-सुरेश लांबे, रोहा – संदीप रेवाले, तळा – विनोद मानकर, महाड- संतोष फिलसे, प्रदीप साळवी, कर्जत – राजेंद्र केळुस्कर. त्याचप्रमाणे द.रायगडमधील तालुक्यांच्या सह संपर्क प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

आगामी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समित्या इ. निवडणुकांच्या मुंबई निवासी बांधवांना एकत्रित करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र घडविण्यासाठी रायगडमधील विकास, बेरोजगारी वाहतूक समस्या सोडविण्यासाठी गावागावात, घराघरात भा.ज.प.चे विचार पोहोचवून शेवटच्या व्यक्तीचा विचार हाच भाजपचा ध्यास या मोहिमेत सामील व्हावे, असे आवाहन कोबनाक यांनी केले आहेत.

Exit mobile version