| मुंबई | प्रतिनिधी |
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी भाजप सरकार जाणार म्हणून विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना लोक स्वीकारत आहेत, असेही भाष्य केले. तसेच, लोकसभा निवडणूकीत लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींना नाकारत असल्याचे म्हटले आहे.
2024 ची निवडणूक आधीच्या निवडणुकीपेक्षा खूप वेगळी आहे. राजकीय पक्षांच्या मोठ्या वर्गाचा आता भाजप आणि नरेंद्र मोदी आवडत नाहीत. ते सर्व पक्ष आता एकत्र येत आहेत. देशाचा मूड नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बदलत आहे. आम्ही महात्मा गांधी आणि नेहरुंच्या विचारांना अनुसरुन सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहोत. आता अनेक तरुण लोक गेल्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाशी जुळवून घेत आहेत. आता परिस्थिती जनता पक्षासारखी होऊ शकते. 1977 मध्ये अनेक पक्ष एकत्र आल्यानंतर जनता पक्षाची स्थापना झाली. नंतर त्यांनी सरकार स्थापन केले. त्यावेळी देखील विरोधकांनी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. जयप्रकाश नारायण आणि जे.बी. कृपलानी यांनी जनता पक्ष स्थापन करण्यासाठी विलीन झालेल्या विविध पक्षांच्या खासदारांशी बोलून मोरारजी देसाई यांची नंतर पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. 1977 मधील मोरारजी देसाईंपेक्षा आज राहुल गांधींचा स्वीकार जास्त आहे.