पेण: भाजप आमदार पुत्राला FIR व्हायरल करणे पडले महागात; कोर्टाने सुनावली शिक्षा

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पेणचे भाजपाचे आमदार रवींद्र पाटील यांचे पुत्र वैकुंठ पाटील यांनी पोस्को गुन्ह्यातील एफआरए सोशल मीडियावर व्हायरल करणे चांगलेच महागात पडले आहे. तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत अलिबाग पोस्को न्यायालयाने वैकुंठ पाटील यांना तीन महिन्यांची कैदेची शिक्षा सुनावली आहे. इतर दोन जणांनाही न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. वैकुंठ पाटील यांची जामिनासाठी मात्र धावपळ सुरू आहे.
पेण येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. सदर गुन्ह्याची एफआयआर प्रत वैकुंठ पाटील आणि त्याच्या दोन साथीदार यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली होती. त्यामुळे संबंधितांची बदनामी झाली होती. याबाबत संबंधितांनी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार पोलिसांनी अलिबाग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
अलिबाग पोस्को न्यायालयात याबाबत आज सुनावणी झाली. यामध्ये वैकुंठ पाटील यांच्यासह दोन जणांवर आरोपपत्र सिद्ध झाल्याने न्यायाधीश शाहीदा शेख यांनी तीन महिन्यांनी कैदेची शिक्षा सुनावली आहे. भाजप आमदार पुत्राला शिक्षा झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. वैकुंठ पाटील हे जामिनासाठी न्यायालयात अर्ज करणार आहेत.

Exit mobile version