। पेण । संतोष पाटील ।
पेण वाशीनाक्यावर राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने दिशादर्शक फलक लावले आहेत. मात्र, दिशादर्शक फलकावर आमदारपूत्र वैकुंठ पाटील यांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या स्वागताचा बॅर्नर लावला होते. त्यामुळे मार्गावरील दिशादर्शक फलक दिसेनासे झाले होते. परिणामी, या मार्गावरुन प्रवास करताना कोकणवासीयांनी त्यांबाबत नाराजी व्यक्त केली होती. मात्र, लावलेले फलक कुठे गेले, असा प्रश्न प्रशासनाला पडला होता. अशातच बुधवारी झालेल्या वार्यासह पावसामुळे वैकुंठ पाटील यांनी लावलेल्या बॅनरचे एक टोक वार्याने फाटले गेले आणि दिशादर्शक फलक सर्वसामान्यांच्या नजरेस आला. त्यामुळे एरव्ही शिस्त पाळणारे भाजपचे आमदार बेशिस्त कसे झाले, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.