पनवेलमध्ये भाजप-मनसेला झटका

| पनवेल | प्रतिनिधी |

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मनसेला मोठा झटका दिला आहे. कारण पनवेलमध्ये भाजपच्या 4 माजी नगरसेवकांनी आणि मनसेच्या 4 पदाधिकार्‍यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सर्वांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली. उद्धव ठाकरेंनी यावेळी सिडकोकडून वसूल केल्या जाणार्‍या मालमत्ता करावर भूमिका मांडली. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसे केंद्र सरकार बदलण्याच्या जिद्दीने मावळे येत आहेत. संख्या वाढत आहे. या सर्वांचं स्वागत आहे. ही टीम आली. ती पनवेलमधील आहे. संजोग वाघेरे यांच्या मावळ मतदारसंघातील आहे. यांचा प्रवेश होत असताना काही गोष्टी आवर्जून सांगायच्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर जाहीरनामे जाहीर करतात. अशक्यप्राय गोष्टी आम्ही करू सांगत असतात. ते सांगतात मूळचे प्रश्‍न दूर राहतात. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्या ज्या काही व्यथा आहेत, त्या त्यांच्या एकट्याच्या नाहीत. तिथले जे काही प्रश्‍न आहेत. त्यावर आंदोलन झाले आहेत. अजूनही सुरू आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मालमत्ता कर हा प्रश्‍न आहे. मालमत्ता कर भरू नये असं नाही. पण डबल वसुली होत आहे. सिडकोकडून वसुली केली जात आहे. महापालिकेकडून कोणतीही सेवा न देता कर आकारली जात आहे. ही जुलूमशाही आहे. दोन लाख 80 हजार जनतेने त्याचा निषेध करत डबल कर भरण्यास नकार दिला आहे. कर जुलमी पद्धतीने वसूल केला जात आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

विषमतेविरोधात आवाज उठवला पाहिजे
पलवा सिटीला मात्र करमुक्ती केली आहे. ही विषमता आहे. त्याविरोधात आवाज उठवला जात आहे. मुंबई महापालिकेची 2017ची निवडणूक लढवताना 500 स्क्वेअरफूटापर्यंतच्या मालमत्ता कर रद्द करू, असं सांगितलं होतं ते केलं. राज्यात आणि केंद्रात आमचं सरकार आल्यावर आम्ही पनवेलमधील कर रद्द करू. कारण नसताना डबल कर भरण्यास आमचा विरोध आहे. वसुली सरकारचा हा विचित्र प्रकार आम्ही थांबवू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
'पनवेलमधून आम्हाला नवीन ताकद'
''पनवेलमधून आम्हाला नवीन ताकद मिळाली आहे. आता पनवेलमध्ये आम्ही चार पावलं पुढे जाऊ'', असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच 2014 आणि 2019लाही भाजपने जाहीरनामे प्रसिद्ध केले होते. ते जाहीरनामे प्रसिद्ध करत राहतील. पण आता ते सत्तेत येणार नाही. त्यांना काहीही बोलण्याचा अधिकार आहे असे मावळ व रायगड लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्‍वभूमीवर रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक व पत्रकार परिषद आज मंगळवार दिनांक 16 एप्रिल रोजी शेलघर येथील जोमा घरत सामाजिक संस्थेच्या सभागृहात जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा ऍड. श्रद्धा ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, पनवेल तालुकाध्यक्ष नंदराज मुंगाजी, डॉ.मनीष पाटील, किरीट पाटील, अखलाख शिलोत्री, मार्तंड नाखवा, रेखा घरत, वैभव पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले.
Exit mobile version