| म्हसळा | वार्ताहर |
रायगडात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जी विकासकामे करण्यात आलेली आहेत त्या कामांचे श्रेय भाजपने घेऊ नये,अशी टीका खा.सुनील तटकरे यांनी म्हसळा येथे पत्रकार परिषदेत केली आहे. म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागात प्रस्तावित व मंजुर असलेले प्रंतप्रधान ग्राम सडक योजना,मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत कामांचे श्रेय घेण्यासाठी सरसावलेल्या भाजप पक्षाचे पदाधिकारी वृत्तपत्रात प्रसिध्दी देवुन लोकांची दिशाभूल करत असल्याने त्यांचा समाचारही तटकरे यांनी घेतला.
म्हसळा तालुक्यातील पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील मंजूर व प्रस्तावित रस्ते विकास आपल्या मागणीने मंजूर करण्यात आली आहेत असे सांगणारे भाजपचे पदाधिकारी जनतेची दिशाभूल व फसवणूक करत आहेत अशाने त्यांचे राजकिय मनसुबे सत्यात उतरणार नाहीत.असेही ते म्हणाले. श्रीवर्धन, माणगाव, रोहा म्हसळा तालुक्यातील जनता सुज्ञ असल्याचे खासदार तटकरे यांनी भाजपचे पदाधिकारी कृष्णा कोबनाक यांचे नाव न घेता त्यांची खिल्ली उडवली. अशाच प्रकारे श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांची कामे त्यांचे शिफारशीने मंजूर झाली असल्याचे निदर्शनास आणून दिले. तटकरे यांच्या समावेत अली कौचाली, महादेव पाटील, समीर बनकर, महेश शिर्के, बबन मनवे, अंकुश खडस, नगरअध्यक्ष असहल कादिरी,उपनगराध्यक्ष सुनिल शेडगे,संजय कर्णिक, महीला अध्यक्षा सोनल घोले आदी मान्यवर उपस्थित होते.