| अलिबाग । वार्ताहर |
जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागांतर्गत शासकीय व स्वयंसेवी संस्थामध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, बालकांसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्यातर्फे जिल्हा क्रीडा संकुल, अलिबाग, नेहुली संगम येथे मंगळवार, दि.03 ते दि.5 जानेवारी या कालावधीत जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा लाभ जास्तीत जास्त क्रीडा प्रेमींनी, नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनित म्हात्रे यांनी केले आहे.