भाजपच्या चित्रा वाघ यांच्याकडून कर्जत शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत शहरात आलेल्या महापुरात उल्हास नदीचे पाणी शिरलेल्या पूरग्रस्त नागरी भागाची पाहणी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.

कर्जत शहरातील सखल भागात महापूराचे पाणी घुसले होते. अचानक आलेल्या पुरामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरात पाणी शिरल्याने घरातील अनेक मौल्यवान वस्तू खराब झाल्या. तसेच घरातील अन्नधान्याची भिजल्याने नासाडी झाली. महापुराच्या पाण्यात कपडे, सोफे, शासकीय कागदपत्रे तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंची अक्षरशः माती झाली.प्रदेश भाजपने सूचना केल्यानंतर भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी कर्जत शहरात येऊन विविध भागांची पाहणी केली. शहरातील विठ्ठलनगर परिसरातील मनोहर कडू यांच्या घरापासून या पाहणी दौर्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शनी मंदिर आमराई, दहिवली परिसरात पुरस्थितीची पाहणी केली.

या पाहणी दोर्यात चित्रा वाघ यांच्यासोबत भाजप कोकण किसान मोर्चाचे कोकण प्रदेश संपर्कप्रमुख सुनील गोगटे, भाजपचे कर्जत तालुका सरचिटणीस राजेश भगत, संजय कराळे, भाजप महिला मोर्चा कर्जत तालुका अध्यक्ष स्नेहा गोगटे, महिला मोर्चा रायगड जिल्ज चिटणीस बिनीता घुमरे, भाजप कर्जत शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, शहर सरचिटणीस प्रकाश पालकर, भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील,युवा मोर्चा शहर अध्यक्ष मयूर शितोळे,युवा मोर्चा सरचिटणीस संदेश कराळे, शहर महिला मोर्चा अध्यक्ष सरस्वती चौधरी, कोकण सोशल मीडिया सेलच्या गायत्री परांजपे, कर्जत नगरपालिकेच्या नगरसेविका स्वामिनी मांजरे, विशाखा जिनगिरे आदींसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.