जसखारमध्ये भाजपला धक्का!

हेमंत ठाकूर यांचे ग्रामपंचायत सदस्यपद रद्द

| उरण | प्रतिनिधी |

जसखार ग्रामपंचायतीतील भाजपचे सदस्य हेमंत ठाकूर यांना मोठा धक्का बसला आहे. सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण केल्याच्या तक्रारीवर सुनावणी घेत ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी 24 सप्टेंबर 2026 रोजी दिलेल्या निर्णयानुसार ठाकूर यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास अनर्ह ठरविले आहे. या निर्णयामुळे त्यांचे सदस्यपद रद्द झाले आहे.

जसखार येथील रत्नाकर म्हात्रे यांनी सुमारे सहा वर्षांपूर्वी हेमंत ठाकूर यांच्याविरोधात गावातील सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण केल्याची तक्रार रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य शासकीय कार्यालयांकडे केली होती. या तक्रारीवर अखेर निर्णय देताना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी रत्नाकर म्हात्रे यांच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे जसखार ग्रामपंचायतीतील राजकीय वर्तुळात या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे.

Exit mobile version