। हमरापूर । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील वाशी खारेपाट भागातील महत्त्वाच्या असणार्या बोर्झे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मयुरी मदन ठाकूर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दीड वर्षांपूर्वी बोर्झे ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. त्यात ग्राम परिवर्तन पॅनलची सत्ता प्रस्थापित झाली. त्यावेळी सर्वप्रथम विजया ठाकूर यांची सर्वानुमते सरपंचपदी निवड करण्यात आली. त्यानंतर ठरल्याप्रमाणे विजया ठाकूर यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला.
या रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी मयुरी ठाकूर यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक अध्यासी अधिकारी कळंबकर यांनी जाहीर केले. त्यानंतर आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाके फोडून आपला विजय साजरा केला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य विजय ठाकूर, संभाजी म्हात्रे, सुष्मा पाटील, विजया ठाकूर, सुप्रिया ठाकूर, महेंद्र ठाकूर आदींसह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते. नवनिर्वाचित सरपंच मयुरी ठाकूर यांचे जि.प.चे माजी सदस्य प्रभाकर म्हात्रे, डी.बी. पाटील, हेमंत पाटील, ग्रामपंचायत सदस्य विजय ठाकूर, शिवसेनेचे पेण शहरप्रमुख संजय पाटील, अशोक वर्तक, रामकृष्ण ठाकूर, वढावचे अशोक पाटील, संदेश ठाकूर, नंदू मोकल, वासुदेव पाटील, मनेश ठाकूर, नामदेव म्हात्रे, राजा पाटील, पदमाकर पाटील, निलेश पाटील यांनी भेटून अभिनंदन केले.